परंडा (प्रतिनिधी)-परंडा शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक येथे मा.आ.सुजितसिंह ठाकूर, युवा नेते मल्हार दादा पाटील, जि.प.सदस्य धनंजय सावंत यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांच्या चरणी वंदन करून या दिव्य सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. हा क्षण केवळ रॅलीचा प्रारंभ नव्हता, तर श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचा साक्षीदार ठरला.
“जय श्रीराम” च्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आणि प्रत्येकाच्या मनात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित झाला. या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करुन पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, परंडा न.प.उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, श्री. गौतम लटके, जयदेव गोफणे, धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, सौ.शैलाभाभी ठाकूर, सौ.ज्योतीताई सावंत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. प्रियंका क्षीरसागर, पंचायत समिती सदस्य सौ. मोनिका पाटील, सौ.सुप्रिया रगडे, शहराध्यक्षा सौ. ज्योतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला ही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

