परंडा (प्रतिनिधी)- आज सोमवार दि.30 रोजी, रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव  संजय कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली, परंड्याचे नगराध्यक्ष  जाकीरभाईं सौदागर यांना परंडा शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा परंडा शहरात शिवाजी महाराज चौकामध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारण्या बाबतचे निवेदन दिले,परंडा शहरात दि.15 सप्टेंबर2024 रोजी महीला मेळाव्याचे निमित्ताने आले असता तत्कालीन मुख्यमंत्री, व आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन आरोग्य मंत्री व परंडाचे विद्यमान आमदार डॉ.प्रा.तानाजीराव सावंतसर यांचे शिफारशीसह, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राज्य सचिव संजय कुमार बनसोडे यांचे नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले, त्याच वेळेस मा. उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी परंडा शहरात दोन्ही महा मानवांचे पुतळे बसवण्याची जाहीर घोषणा केलेली आहे, त्याच घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करून परंडा शहरात,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चौदा एप्रिल चे मुहूर्तावर पुतळे बसवण्याबाबतचे निवेदन दिले, सोबत रिपब्लिकन पक्षाचे  तालुकाध्यक्ष दादासाहेब सरोदे  माजी तालुकाध्यक्ष फकीर दादा सुरवसे, रिपाई नेते अमोल चौतमहाल, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, जयपाल बनसोडे अक्षय कांबळे ,विजय बनसोडे सिद्धार्थ बनसोडे, विश्वास बनसोडे ,वामन शिंदे आकाश लोखंडे व आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते, तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जाहीर केले नुसार पुतळा बसविण्याची सकारात्मक कार्यवाही तात्काळ करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष  जाकीरभाईं सौदागर यांनी यावेळी दिले.


 
Top