भूम (प्रतिनिधी)- यावर्षी पर्जन्यमान जास्त झाल्याने सर्वत्र डोंगर दर्याने झाडे झुडपे अधिक प्रमाणात वाढले असल्याने रस्त्यालगत गवत जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी ते जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यामध्ये असल्या उन्हाच्या धगधगते मध्ये चिमणी पाखरू पक्षी यांचा जीव घरटे जळून खाक झालेली दिसून आली येताच मौजे हाडोंग्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी नालंदा रवींद्र लोमटे इयत्ता 2 री या विद्यार्थिनीने उन्हामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला पिण्याच्या पाण्याची सतत गरज भासते उन्हामध्ये माणसांचा देखील जीव लाईलाई होत आहे ही गोष्ट लक्षात घेता या पशु पक्षांना उष्माघाताचा त्रास होऊ नाही म्हणून विद्यार्थिनीने घराशेजारी असलेल्या छोट्याशा झाडाला एका बिसलरी बॉटलमध्ये पाणी भरून ते झाडाला बांधून ठेवली आहे आणि सोबत जवारीच्या धान्याचे कणीश या झाडाला बांधल्याचे  दिसत आहे या माझ्या पशु पक्षांना तहान व भूक लागल्यास त आपल्याला मागू शकत नाही म्हणून  उष्णतेमुळे पशु पक्षांचा अन्नधान्य धान्य पाण्यावाचून मृत्यू होऊ शकतो. पशु पक्षांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरावर पाण्याची व्यवस्था केली पाहिजे .पाणी हे जीवन आहे पाण्याशिवाय पशु पक्षी मानव प्राणी जगू शकत नाही.2 री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पशु पक्षांना पाण्याची व्यवस्था करून . पशु पक्षांना अन्नधान्याची व पाण्याची गरज असल्याचे एक प्रकारचा इथल्या मानव समूहाला संदेश दिल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमामुळे तिचे कौतुक होत आहे.

 
Top