धाराशिव (प्रतिनिधी)-  नकोशी असलेली, कुमारी माता, घटस्फोट व इतर कारणामुळे जन्मताच बाळांना रस्त्यावर फेकून देणे किंवा कचराकुंडीमध्ये टाकून जाणे यामुळे बालकांचे जीवन धोक्यात येते. मात्र, अशाच बालकांना धाराशिव येथील अंकुर शिशुगृहामध्ये आणून त्याचे जीवन फुलविले जाते. या शिशुगृहामध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये 21 बालके असून, त्यापैकी 10 बालकांना भुवनेश्वर (ओडिशा), नंदियाल (आंध्र प्रदेश), पुणे, मुंबई, मुंबई उपनगर, अहमदाबाद (गुजरात) आदी शहरातील मोठ्या उद्योगपतींच्या घरात हे बालके दत्तक विधान् कायद्यानुसार पुनर्वसित झाले आहेत. अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटल व अंकुर शिशुगृहाचे प्रमुख डॉ. दिग्गज दापके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

धाराशिव शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अंजुमन सोसायटी व सह्याद्री हॉस्पिटलच्यावतीने आयोजित ईद-ए-मिलाद व पत्रकार परिषद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे फेरोज पल्ला उपस्थित होते. 


एक बालक अमेरिकेत

या शिशुगृहातील एक बालक अमेरिकेत जाण्याची शक्यता असल्याचे डॉ. दिग्गज दापके यांनी सागून, त्यानुसार केंद्र सरकारकडून प्रोसेस चालू असल्याचे सांगितले. दत्तक विधान कायद्यानुसार त्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती चांगली असणे आवश्यक आहे. दत्तक घेणाऱ्या पती-पत्नीची संमती असण्याबरोबरच त्या दांपत्यांना कुठलाही जीवघेणा आजार आहे का ? त्यांचे वय तसेच त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड आहे का ? याची तपासणी केली जाते. विशेष म्हणजे दत्तक घेण्यासाठी 30 हजार दामप्त्य वेटींगवर असल्याचे डॉ. दापके यांनी सांगितले. 


दानशूरांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे करावा 

हा प्रकल्प लोकसहभाग व संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे अशा पालकांचे व्यवस्थित पालन पोषण व त्यांची जपणूक व्हावी यासाठी जास्तीत जास्त दानशुरांनी आर्थिक मदत करावी. असे आवाहन डॉ. दिग्गज दापके यांनी केले. 


 
Top