तुळजापूर (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.13) राजकीय हालचालींना वेग आला होता. निवडणुकीपूर्वी महायुतीतील सदस्यांना थेट तुळजापूर येथे आणून दोन थ्री-स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीचे केंद्रबिंदू तुळजापूर ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महायुतीतील भारतीय जनता पक्ष व शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे जिल्हा परिषद सदस्य वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबविण्यात आले होते. येथे भाजपचे सदस्य ठेवण्यात आले होते. तर येथे शिवसेना (शिंदे गट) चे सदस्य मुक्कामी होते. विशेष म्हणजे स्कायलंड हॉटेलमध्ये थांबलेल्या भाजप सदस्यांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सरचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदस्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. तुळजापूर हा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा मतदारसंघ असल्याने महायुतीतील सदस्यांना येथेच थांबविण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही राजकीय दगाफटका होऊ नये, यासाठी ही रणनीती आखण्यात आल्याचीही चर्चा रंगली. दरम्यान, तुळजापूरमध्ये थांबलेले महायुतीचे सर्व सदस्य दुपारी सुमारे एक वाजता एका लक्झरी बसमधून थेट धाराशिव येथे जिल्हा परिषद सभागृहात मतदानासाठी रवाना झाले. बसच्या पुढे-मागे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा होता. यंदाच्या निवडणुकीचे केंद्रबिंदू तुळजापूर राहिल्याचे स्पष्ट झाले.

 
Top