तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील अवघ्या दहा वर्षांच्या ध्रुव जाधव या चिमुकल्याने आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. केक कापणे, फुगे लावणे याऐवजी ध्रुवने आपल्या घरासमोरील परिसर आजोबा आणि वडिलांसोबत स्वच्छ करून वाढदिवस साजरा केला.
“महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारताचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. आमच्या जाधव परिवारातील तीन पिढ्या परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहेत,” असे ध्रुवने अभिमानाने सांगितले. स्वच्छतेची प्रेरणा त्याला घरातूनच मिळाल्याचे तो सांगतो. “संत गाडगे बाबांनी दिलेली स्वच्छतेची शिकवण माझ्या वडिलांकडून मला आणि माझ्या पिढीला मिळाली,” असेही त्याने नमूद केले. ध्रुव हा विकास पोपटराव जाधव (चेअरमन, एकनाथ फाउंडेशन तुळजापूर) यांचा मुलगा असून, लहान वयातच समाजभान जपणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे स्वच्छतेचा संदेश समाजात अधिक प्रभावीपणे पोहोचत असून, नव्या पिढीसमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण होत आहे. वाढदिवसाचा अनोखा उपक्रम : ध्रुव जाधवकडून स्वच्छतेचा संदेश
तुळजापूर येथील अवघ्या दहा वर्षांच्या ध्रुव जाधव या चिमुकल्याने आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. केक कापणे, फुगे लावणे याऐवजी ध्रुवने आपल्या घरासमोरील परिसर आजोबा आणि वडिलांसोबत स्वच्छ करून वाढदिवस साजरा केला. “महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारताचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. आमच्या जाधव परिवारातील तीन पिढ्या परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहेत,” असे ध्रुवने अभिमानाने सांगितले. स्वच्छतेची प्रेरणा त्याला घरातूनच मिळाल्याचे तो सांगतो. “संत गाडगे बाबांनी दिलेली स्वच्छतेची शिकवण माझ्या वडिलांकडून मला आणि माझ्या पिढीला मिळाली,” असेही त्याने नमूद केले. ध्रुव हा विकास पोपटराव जाधव (चेअरमन, एकनाथ फाउंडेशन तुळजापूर) यांचा मुलगा असून, लहान वयातच समाजभान जपणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
