तुळजापूर (प्रतिनिधी)- शिक्षण मंत्रालय केंद्र सरकार व CBSE व NCERT मार्फत चालवल्या जात असलेल्या प्रेरणा अनुभवात्मक शिक्षण उपक्रमासाठी जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर नोडल स्कुल धाराशिव येथे 5 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत देशातून 20 मुलांची निवड करण्यात आली. यामध्ये श्री.कुलस्वामिनी विद्यालय तुळजापूर येथील 9 अ मधील विद्यार्थी सुमित सर्वोत्तम जेवळीकर याची प्रेरणा अनुभवात्मक शिक्षण केंद्र वडनगर, गुजरात साठी निवड झाली आहे. हे प्रशिक्षण येत्या मे महिन्यात 7 दिवस चालणार आहे. या यशाबद्दल शिक्षणाधिकारी धाराशिव, गटशिक्षणाधिकारी तुळजापूर, नवोदय विद्यालय तुळजापूरचे प्रभारी प्राचार्य डी.व्ही बडे तसेच प्रेरणा समन्वयक संजय माने यांनी जेवळीकर सुमित सर्वोत्तम याचे अभिनंदन करून वडनगर, गुजरात येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कुलस्वामिनी विद्यालय तुळजापूर येथील सांस्कृतिक विभाग प्रमुख भालेराव सर यांनी केले त्याचा यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
