भुम (प्रतिनिधी)- जि प प्रा शा सावरगाव (पा )येथे आज इ.चौथी च्या विद्यार्थ्यांचा  स्वयं शासन दिन व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होतो.या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री. आण्णा महानवर, सल्लागार सदस्य श्री प्रकाश यादव, श्री. मधुकर महानवर  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच श्रीम. पोतरे मॅडम, कांबळे मॅडम, नभा महानवर, स्वाती महानवर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थी मुख्याध्यापक कुमार-सत्यजित यादव तर उपमुख्याध्यापिका कुमारी- स्वराली लोकरे या होत्या एकूण अकरा विद्यार्थी इयत्ता चौथी मधील हजर होते.संकटे येत जातील आपण प्रयत्न करणे सोडले नाही पाहिजे“   “अभ्यासातील सातत्य, काहीतरी करण्याची जिद्द, शिस्त, संयम आणि सुसंस्कार जर अंगी असतील तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी आडवू शकत नाही. मुले हे मातीचा गोळा असतात.. त्यांना आकार देण्याचे कार्य शिक्षक करतात. जीवनात खूप गुरु येतात पण प्राथमिक शाळेतील गुरु चे सर्वश्रेष्ठ असतात.हा मुलमंत्र प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना दिला विद्यार्थी मनोगत , अल्पोपहार,फोटो सेशन, भेटवस्तूमध्ये इयत्ता चौथीच्या मुलांनी शाळेला महात्मा गांधी, आण्णाभाऊ साठे,यशवंतराव चव्हाण,राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले इत्यादी फोटो संच मुलांनी शाळेला भेट दिली.,मुलांचे शिकवणे यांनी या कार्यक्रमाला बहार आली.अध्यक्षस्थानी सल्लागार समितीचे श्री. प्रकाश यादव सर होते सुत्रसंचलन व आभार श्री. माधव पोतरे सर यांनी व्यक्त केले.


 
Top