भुम (प्रतिनिधी)- जि. प. प्रा. शा. सावरगाव (पा )येथे अतिवृष्टी आप्तकालीन सहायता संघाचे तालुका प्रमुख भगत सर व दत्तात्रय गुंजाळ यांच्या सहकार्याने आज प्रा. शा. सावरगाव (पा ) ता. भूमला एक ऑफिस टेबलं आणि एक व्हील चेअर जवळपास सात हजार रुपयाच्या वस्तू देण्यात आल्या.त्याबद्दल दोन्ही मान्यवरांचे शाळेच्या वतीने शाल आणि पुष्पगुछ देऊन यथोचित स्वागत करून, त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सदरील स्वागत आणि आभार कार्यक्रमात मान्यवरांनी शाळेतील चिमुकल्याना अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. गणित तज्ञ् श्री. भगत सरांनी मुलांनी मोबाईल पासून दूर व्हावे आणि पुस्तकाला जवळ करावे असा कानमंत्र दिला.इंग्रजी एक्स्पर्ट सन्माननीय श्री. गुंजाळ सरांनी मुलांनी अभ्यासात सातत्य ठेवावे, दररोजचा अभ्यास दररोज पूर्ण करावा. कोणतेही काम आवडीने करा म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही. समजून जर तुम्ही अभ्यास केला तर इंग्लिश आणि गणित या विषयासारखा सोपा विषय कोणताही नाही.तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही केंद्र, तालुका नव्हे तर जिल्हा किंवा राज्यस्तरावर तुम्ही नक्कीच पोहचाल.अश्याप्रकारे मुलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून मुलांचे मनोबल वाढविले.सदरील कार्यक्रमास उपस्थित मान्यवर शा. व्य. समितीचे अध्यक्ष शिवदास लोकरे, सदस्य डोंगरीबुवा महानवर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आण्णा महानवर, सल्लागार सदस्य प्रकाश यादव, मधुकर महानवर, समाधान यादव, हनुमंत महानवर,माजी सरपंच अर्जुन महानवर,गावातील जेष्ठ नागरिक, शिक्षणप्रेमी पालक, तरुण मंडळ,श्रीम. कांबळे मॅडम, श्रीम. नभाताई महानवर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामस्थांनी मान्यवरांचे टाळ्याच्या गजरात स्वागत केले. शालेय परिसर स्वच्छ व सुंदर पाहून मान्यवर आनंदीत होऊन समाधान व्यक्त केले. शाळेला वेळोवेळी मदत केली जाईल असे आश्वासन उपस्थितांना मान्यवरांनी दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे. मुख्याध्यापक श्री पोतरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका श्रीम. पोतरे मॅडम यांनी मानले.
%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80.jpg)