परंडा (प्रतिनिधी)- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी बिबीशन खुणे यांची निवड करण्यात आली आहे.

दिनांक 15 रोजी  एम ई टी कॉलेज बांद्रा मुंबई येथील कार्यक्रमात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे  संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या हस्ते हे निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी  कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, ओबीसी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ,  उपाध्यक्ष सुभाष राऊत, मराठवाडा  विभागीय अध्यक्ष आबासाहेब खोत आदी उपस्थित होते. बिभिषण खुणे यांच्या निवडीबद्दल परंडा तालुक्यासह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.

 
Top