धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे आमदार माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर श्रद्धा ठेवत पक्षात जाहीर प्रवेश केला.

सावंत कुटुंबातील ज्योतीताई धनंजय सावंत,  संजय सावंत, सोहम सावंत, अजिंक्य सावंत यांच्यासह  गौतम लटके, दत्तात्रय मोहिते, श्रजयदेव गोफणे आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत पक्ष संघटनेला नवी ऊर्जा दिली.

पक्षाच्या प्रदेश कार्यालयात, प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा भव्य प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दत्ताभाऊ कुलकर्णी, धनंजय सावंत, अनिल काळे, संताजी चालुक्य तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top