तेर (प्रतिनिधी)- हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी विराट हिदू संमेलन घेतली जातात असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते  राजेश संन्याशी (संभाजीनगर) यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे विराट हिंदू सम्मेलनाचे 21 मार्चला सायंकाळी आयोजन करण्यात आले होते त्यावेळी राजेश संन्याशी बोलत होते.                            अध्यक्षस्थानी विराट हिदू सम्मेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड.बालाजी भक्के  होते. तर हभप नवनाथ महाराज चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना राजेश संन्याशी म्हणाले की, हिंदू ही संस्कृती आहे.भारतामध्ये  विविधतेमध्ये एकता आहे.परस्त्री म्हणजे मातेसमान आहे.एकत्र कुटुंब पद्धती कुटूंबातील सर्वांना सुसंस्कृत बनवते असे प्रतिपादन केले.सर्वप्रथम मुख्य रस्त्यावरून भारतमाता प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी नवनाथ महाराज चिखलीकर यांचे अशिर्वचऩ झाले .प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले.अभार अभिजित सराफ यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


 
Top