धाराशिव(प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जल व भूमी व्यवस्थापन विभागातर्फे विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, प्रा. पानढवळे स्वप्नाली, एम. एस्सी. भाग 1 व भाग 2 चे विद्यार्थी व कर्मचारी यांनी विद्यापीठ- उद्योग शिखर संमेलन 2026 चे आयोजन ज्ञान प्रबोधिनी हराळी, या संस्थेचे संस्थापक श्री अभिजित कापरे, तसेच नेटाफेम इरिगेशन कंपनीचे श्री मनोज लोमटे, कोठारी इरिगेशन कंपनीचे श्री प्रदीप जाधव, प्रिमियर इरिगेशन कंपनीचे श्री अक्षय कुलकर्णी, ज्ञान प्रबोधिनी हराळीचे श्री सचिन सुर्यवंशी, प्राइड इंडिया (एनजिओ) चे श्री ओंकार भोरे, व कोठारी इरिगेशनचे श्री निखिल भालेराव यांनी आजच्या काळात जल स्त्रोतांचे संरक्षण, आणि जमिनीची योग्य वापर का महत्वाचा आहे? आणि आगामी काळात जल व भूमी व्यवस्थापन विभागाची भूमिका अधिक महत्वाची असणार आहे व हवामान बदलामुळे जल स्त्रोतांवर दबाव वाढत आहे. त्यामुळे विभाग संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानाद्वारे जलसंवर्धन व जमिनीच्या शाश्वत वापराबाबत महत्वाचे मार्गदर्शन केले. तसेच विभागातील विद्यार्थ्यांनी संमेलनामध्ये संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले आणि जल व भूमी व्यवस्थापनातील नव्या तंत्रज्ञानाची चर्चा केली. या विभागाच्या सदर उपक्रमामुळे शेतकर्यांना तसेच येणाऱ्या तरुण पिढीला पाण्याचा कार्यक्षम वापर करुन जमिनीची सुपिकता वाढविण्याच्या पद्धती, शिकायला मिळतील त्या अनुषंगाने जल व भूमी व्यवस्थापन या विभागाचे येणाऱ्या दशकात अत्यंत महत्त्वाचे व मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
