परंडा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्रह्मगाव तालुका परंडा या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि.28 रोजी संध्याकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.ज्ञानदेव काजळेकर महाराज, परंडा पंचायत समितीच्या नवनिर्वाचित  सदस्या डॉ.धनश्री विश्वास लोकरे यांच्या वतीने प्रतिनिधी विश्वास आप्पा लोकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ॲड.सुप्रिया गुंड पाटील, पिंपळवाडी-ब्रम्हगांवचे  सरपंच रुपेश काळे, कल्याणराव भातलवंडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  रमेश नलवडे, वडनेर-सरणवाडीचे उपसरपंच नारायण सांगडे, ग्रामसेवक रोहित भुजबळ, केंद्रप्रमुख प्रदिप खराडे, मेजर लक्ष्मण खबाले, मेजर नितीन गिरी, प्रगतशील बायतदार नानासाहेब बागल आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये स्वागतगीत, देशभक्तीपर गीत, शेतकरी गीत, बडबडगीत, हिंदी फिल्मी गीत, छत्रपती शिवाजी महाराज गीत,लावणी, खंडोबा गीत, तुळजाभवानी गीत, साऊथ इंडियन गीत ,नाटिका इ.कार्यक्रम  विद्यार्थ्यांनी सादर केले.सलग चार तास चाललेल्या कार्यक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.मोठ्या संख्येने गावातील महिलांची उपस्थिती होती.

अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करुन सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा नेते तथा केंद्रीय मुख्याध्यापक  अरुण पाटील,लोणी शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ गटकळ , सानेगुरुजी शिक्षक पतसंस्थेचे संचालक  धनाजी खरात, परंडा तालूका शिक्षक पतसंस्थेचे संचालक आप्पा बल्लाळ,परंडा तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक युवराज खाडे,कल्याणसागर माध्य विद्यालयाचे सहशिक्षक मुकुंद भोसले,आदर्श उपक्रमशील शिक्षक श्रीपाद दुधाळ,कांदलगाव शाळेचे मुख्याध्यापक प्रविण कुलकर्णी, सरणवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक घनश्याम पाटील,श्री प्रसाद दुधाळ उपस्थित होते.

उपस्थित प्रमुख पाहुणे व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमात बक्षिसांचा वर्षाव केला.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामस्थ व उपस्थित प्रेक्षकांनी रु.44700/- रु चा लोकवाटा जमा केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व व्यवस्थापन समिती पदाधिकारी, पोलिस पाटील,अंगणवाडी ताई व मदतनीस, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, ग्रामस्थ बंधु भगिनी, युवा वर्ग या सर्वांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक  लहु मासाळ यांनी केले.

 
Top