धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव  कार्यक्षेत्र मौजे धुत्ता येथे ऊस पिकातील AI तंत्रज्ञानात भाग घेतलेल्या 25 शेतकऱ्यांच्या शेतावर   जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी विचारून  त्या सोडवण्याचा प्रयत्न केला  येथील शेतकऱ्यांनी कारखान्या मार्फत शेतकऱ्यांना बारामती  कृषी प्रदर्शन व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील  ज्ञानयाग प्रशिक्षणाला घेऊन  गेल्याने फायदा झाला   असे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अरविंद(दादा) गोरे साहेब, संचालक अँड निलेश पाटील, मा. भारत गुंड,  मा.सतिश मुंगळे मा. हरी डोलारे मा.लक्ष्मण चव्हाण मा.भारत सोनटक्के,मा.फिरोज शेख, दिगंबर माने, एखंडे, पिंपरे इत्यादी प्रगतशील  शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.

 एकरी 100 टन निघण्याच्या प्रेरणेने नवीन होतकरू तरुण शेतकरी यांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान  अवगत करून त्यादृष्टीने सर्वांची वाटचाल पाहून सहकार रत्न अरविंद दादा गोरे यांनी समाधान व्यक्त केले.

 
Top