धाराशिव (प्रतिनिधी)-  जागतिक क्षयरोग दिनानिमित्त धाराशिव येथे टीबी मुक्त भारत अभियान 2.0 अंतर्गत 100 दिवसीय मोहिमेचे उद्घाटन समारंभ जिल्हा परिषद स्थायी समिती सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील होत्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास ,सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.मारोती कोरे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनय कुलकर्णी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बनसोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमजान अली तसेच तालुका आरोग्य अधिकारी,विविध कार्यकर्ते,आरोग्य कर्मचारी व जिल्हा क्षयरोग केंद्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 24 मार्च 2026 पासून सुरू झालेल्या या 100 दिवसीय मोहिमेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील क्षयरुग्णांची संख्या कमी करणे हा आहे. या अभियानाअंतर्गत जोखीमग्रस्त गावांतील 14 वर्षांवरील नागरिकांची एक्स-रे तपासणी करण्यात येणार आहे.यासाठी जिल्ह्यातील एकूण 185 जोखीमग्रस्त गावांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये भूम  7,धाराशिव  36, कळंब  25, लोहारा  14,उमरगा  31, परांडा  18,तुळजापूर  44 व वाशी  10 गावांचा समावेश आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बनसोडे यांनी केली. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष तसेच अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

 
Top