धाराशिव (प्रतिनिधी)-  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मांडलेल्या अर्थ संकल्पामध्ये देशातील पायाभूत सुविधासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधासाठी 1 लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यासाठी यांचा लाभ होणार आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात महिला हॉस्टेल, बचत गट, बिग मॉल आदींचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे लाईव्ह पर्यटन असल्यामुळे याठिकाणी 500 एकर जागेमध्ये पर्यटन विद्यापीठ निर्माण करण्याच्या प्रयत्न करणार आहे. त्यासाठी नुकतीच पर्यटन सचिव खंदारे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मंगळवार दि. 3 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस नितीन काळे, जि.प. चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, राहुल काकडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पाटील यांनी तेरमध्ये पण पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन चालू आहे. कोट टेकडी येथील हे उत्खनन प्रत्यक्ष पाहता यावे यासाठी प्रक्षेकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तेर ते तुळजापूर हा रस्ता सिमेंट कॉक्रेटचा बनवून टेंपल डाऊन सर्वागिण विकास या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे होणार आहे. त्याप्रमाणे उस्मानाबाद शेळी, फटाके उद्योग आदींसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 


दहा कलमी कार्यक्रम 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा जाहीरनामा जाहीर केला असून, या जाहीरनाम्यात दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये लोकाभिमुख प्रगत व पारदर्शक प्रशासन, आरोग्य आपल्या दारी, पर्यटन विकास, महिला सक्षमीकरण, ग्रामपंचायतला सौरऊर्जेंद्वारे शुन्य वीज बील, अद्यावत डिजीटल शिक्षण, स्थानिक युवकांना रोजगार प्राधान्य, शेळीपालनातून आर्थिक क्रांती, गाव तिथे पक्के रस्ते, गाव पातळीवरील पाणी पुरवठा योजना युध्दपातळीवर पूर्ण करणे आदी या दहा कलमी कार्यक्रमाद्वारे ग्रामीण भागातील कामे युध्दपातळीवर केले जातील असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या पत्रकार परिषदेतमध्ये सांगितले. 


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top