धाराशिव (प्रतिनिधी)- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान याच्याशी केल्यामुळे धाराशिव इथं हिंदुत्वाची संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध करण्यात आला तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

सकल हिंदू समाज आणि धाराशिव येथील शिवप्रेमींच्या वतीने आज धाराशिव इथे हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की हिंदू धर्मातील अनेकांचे सक्तीने धर्मांतर,हिंदू धर्मीयांच्या मंदिरांची तोडफोड मुर्त्यांची नाशदोस करणाऱ्या,तसेच हिंदू धर्मियांचा छळ करणाऱ्या आक्रमक टिपू सुलतान याची हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांची तुलना करून हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि हिंदुत्ववाद्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या निवेदनावर एडवोकेट रवींद्र कदम, विक्रम साळुंखे, उपनगराध्यक्ष अक्षय ढवळे, नगरसेवक आकाश तावडे ,अमोल राजे निंबाळकर, एडवोकेट अमोल लोहार, एडवोकेट कोरे, केतकी कुलकर्णी, शिवानी परदेशी यांच्यासह शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे पदाधिकारी आणि अनेक शिवप्रेमींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top