कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरातील व्यापाऱ्यांनी जुन्या व्यवसायिकांना व्यवसाय कर मधून सवलत देण्याची मागणी व्यवसाय कर आयुक्त व अर्थमंत्री यांना करत शासनाकडे निवेदन सादर केले आहे. अनेक व्यापारी गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करत असून त्यांच्यावर कराचा वाढता भार पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, शहरातील काही व्यापारी 30 ते 35 वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. मात्र, अद्यापही त्यांना कोणत्याही प्रकारची करसवलत मिळत नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे किमान 30 वर्षे व्यवसाय केलेल्या ज्येष्ठ व्यापाऱ्यांना व्यवसाय करातून पूर्ण सूट देण्यात यावी, तसेच 20 ते 25 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्यांसाठीही विशेष सवलत योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, PTEC आणि PTRC  नोंदणी प्रक्रियेत सुलभता आणून व्यापाऱ्यांना अनावश्यक अडथळ्यांपासून दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. शासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून ज्येष्ठ व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, अशी भावना व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे अनेक लघु व मध्यम व्यावसायिकांना दिलासा मिळेल आणि स्थानिक व्यापाराला चालना मिळेल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


 
Top