भूम (प्रतिनिधी)-  येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भूम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास कानगुडे होते. तर अध्यक्षा स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका अनुराधा औताडे होत्या.

पोलीस निरीक्षक आपल्या मनोगत म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी अडथळ्यातून मार्ग काढणे महत्त्वाचे असते. महान व्यक्ती या छोट्या खेडेगावातून जन्माला आल्या आहेत  आणि त्यांनी देश व महाराष्ट्र घडविला आहे .तुमच्यासाठी पदे वाट पाहत आहेत. आयुष्यात अपयशानंतर उभे राहणे महत्त्वाचे असते. आईन्स्टाईनप्रमाणे आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जीवन जगल्यास आयुष्यात आपण खूप मोठं राष्ट्र कार्य करू शकतो “ असे सांगितले. कार्यक्रमाला इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका रुकसार शेख पर्यवेक्षक संकेत दळवी तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक तात्या कांबळे,  के. सी. पवार, डी. जी. पाटील, यु. पी. पायघन, डी. एस. गुंजाळ, मुकटे प्रतिभा, कैलास शिंदे, साठे हरीश, सागर अकोस्कर, पालक मृदंगे उपस्थित होते. नववीचे वर्गशिक्षक के. सी. पवार यांनी निरोप समारंभानंतर नववीच्या वर्गातर्फे जेवण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थ्यांनी सिद्धी राऊत व वैष्णवी भोसले यांनी केले.

 
Top