भुम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्याची ओळख आता केवळ दूध उत्पादक तालुका न राहता खवा क्लस्टर म्हणून व्हावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन भूम येथील उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी  जिल्हा अधिक्षक कृषी अधीकारी धाराशीव राजकुमार मोरे तसेच प्रकल्प संचालक आत्मा धाराशीव विष्णू मिसाळ, उपविभागीय कृषी अधिकारी भूम भागवत सरडे आणि तहसिलदार भूम जयवंत पाटिल व इतर मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भूम यांच्या वतीने बुधवार दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी रामहारी मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार-विक्रेता संमेलन आणि केळी पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकरी आणि खवा व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भूम आणि वाशी परिसरातील खवा उद्योगाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात केळी पीक परिसंवाद 2026 पार पडला. यावेळी कृषी विद्यापीठातील केळी पिकातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी भूम अतूल ढवळे यांनी केले. तसेच सुत्रसंचालन हर्षल यादव यांनी केले. आभार प्रदर्शन रोशनी भामरे यांनी केले. या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमासाठी केळी पिकासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण डोके, प्रताप गाढवे, रवी गवळी, आबासाहेब जाधव, योगेश म्हसे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच खवा खरेदिदार -विक्रेता संमेलन याकरीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनोद जोगदंड, भरत दळवे हे मान्यवर लाभले. या कार्यक्रमासाठी अंदाजे 600-700 शेतकरी उपस्थित होते.


 
Top