धाराशिव (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे लोकनेते, स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त आज पवनराजे कॉम्प्लेक्स येथे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. हा दिवस केवळ स्मरणाचा नसून, पवन राजे यांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचा दिवस असल्याचे सांगून खरे खुरे जनतेचे पवन राजेनिंबाळकर कैवारी होते अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. 

या जयंती दिनाचे औचित्य साधून पवनराजे कॉम्प्लेक्स येथील त्यांच्या प्रतिमेस व स्मृतीस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. साहेबांनी आयुष्यभर जोपासलेली मूल्ये आणि जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला.

याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख नंदू राजेनिंबाळकर, अतिश पाटील, शहर प्रमुख सोमनाथ गुरव, प्रवीण कोकाटे, राजाभाऊ पवार, गणेश खोचरे, संभाजी सलगर, प्रशांत साळुंके, नितीन गरड, मनोज पडवळ, मोईन पठाण, सतीश लोंढे, विनोद केजकर, शहाजी पवार, अमित लोंढे, बापू चव्हाण, हनुमंत देवकत्ते, सह्याद्रीराज राजेनिंबाळकर, रवी कोरे, महेश उपासे, संदीप शिंदे, सुरज पडवळ, प्रभाकर राजेनिंबाळकर, ओम भिसे, गायकवाड उपस्थित होते.  यावेळी उपस्थित सर्वांनी पवनराजे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. “साहेबांचे कार्य हे आमच्यासाठी सदैव मार्गदर्शक राहील,“ अशा शब्दांत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 
Top