वाशी (प्रतिनिधी)- वाशी  येथील शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

वाशी व वाशी तालुक्यात  सर्वत्र 396 वी शिवजयंती साजरी करण्यात आली. वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजयंती जन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी वाशी तहसीलच्या नायब तहसीलदार  विद्या राठोड, वाशीच्या नगराध्यक्षा  विजयाताई गायकवाड, उपनगराध्यक्ष  सुरेश कवडे, शिवसेना (उबाठा गट) नेते प्रशांत चेडे, महसुल सहायक अधिकारी चंद्रकांत कदम,  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मच्छिंद्र कवडे, माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, सोसायटीचे चेअरमन नानासाहेब कवडे, नगरसेवक संतोष गायकवाड,सतीश शेरकर, राजू कवडे, भाजपाचे नेते शिवाजीराव उंदरे,संदीप हुंबे,सुनील चेडे, वाशीचे ईतर मान्यवर व शिवप्रेमी हजर होते. या मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याची पुजा व आरती करुन महाराजांना मुजरा करण्यात आला. यानंतर वाशी शहरातून शिवपुतळ्याची सजविलेल्या बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीमध्ये उंट, घोडेस्वार यांनी सहभाग घेतला होता.

वाशी शहरात या व्यतिरिक्त  पारा चौक व वर्तक चौक या दोन ठिकाणी सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी वाशीचे उपनगराध्यक्ष  सुरेश कवडे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. वाशी येथील प्रदिप कवडे या शिव भक्ताने त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरावर  शिवजयंतीच्या  निमित्ताने महाराजांचा मोठा अश्वारूढ पुतळ्याची स्थापना केली. या पुतळ्याचीही  सुरेश कवडे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.  आज वाशी शहरात सर्वत्र शिवाजी महाराज की जय, जय भवानी ,जय शिवाजी या घोषणा ऐकायला येत होत्या. या घोषणांनी सर्व वातावरण दणाणून गेले होते. वाशी येथील नगर पंचायत,पोलीस ठाणे, कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी अर्बन बँक, ईतर शासकिय कार्यालय व खाजगी घर या ठिकाणी ही शिवजयंती साजरी करण्यात आली.

 
Top