धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नायगाव (ता.कळंब) येथील लिंबराज शितोळे, दत्ता भागवत शितोळे, सुधाकर शितोळे या शेतकऱ्याच्या घरावरील अश्वारूढ पुतळ्याचे पूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिताराम शितोळे, बालाजी शितोळे, वैभव पाटील, विष्णू लामतुरे, गोविंद बागे, जीवन शितोळे, गोपीनाथ माळी, दामोदर गोरे, संकेत शितोळे, विष्णू शितोळे, अभिजीत शितोळे यांच्यासह गावातील मान्यवर व तरुण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
