वाशी (प्रतिनिधी)- वाशी येथे आज ( 18 फेब्रुवारी ) रोजी शिवजयंती निमित्त शहरातून शिवध्वज यात्रा काढण्यात आली. 350 फुट लांबी असलेला भगवा ध्वज हातामध्ये घेऊन युवकांनी ही यात्रा काढली.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. यामुळे सर्वत्रच महाराजांच्या जयंतीचा उत्साह आहे. वाशी येथे ही जयंतीचा उत्साह दिसून येत आहे. या निमित्ताने रक्तदान, पोवाडे, शिवध्वज यात्रा व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज वाशी शहरातून शिवध्वज यात्रा काढण्यात आली. यासाठी 350 फुट लांब भगवा शिवध्वज आणण्यात आला होता. वाशी येथील कालेज रोड, समता नगर पासून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. लांबच्या लांब ध्वज हातात घेऊन निघालेली ही यात्रा वाशी करांच्या कुतुहलाचा विषय ठरत होती. ही यात्रा वाशी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवाजी नगर, पारा चौक, वर्तक चौक, लक्ष्मी रोड मार्गे परत छ. शिवाजी महाराज चौक येथे पोहचली. या ठिकाणी या यात्रेचे विसर्जन करण्यात आले. या यात्रेमधे युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
%20%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%201.jpg)
%20%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80.jpg)