भुम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नवीन नियोजित वरवधूचा सोलापूरधुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोल वेच्या कमानीला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय आणि इजोरा रहिवाशी हल्ली मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मूलगी अक्षया यांचा गेल्या रविवारी (ता.15) मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता.

मयत नववधू अक्षया हिची आज लातूर येथे  महापारेशनची परीक्षा होती परीक्षा देण्यासाठी वाशी येथून पहाटेच घरची टाटा नेक्सॉन गाडी क्र. एम एच 25 बी एफ 5064 गाडीतून जात असताना हा अपघात झाला. रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली.धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुरडला गेला नववधू अक्षया सुनील चव्हाण (वय.23) आणि वर मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे याचा (वय. 25) अपघातात जागीच मृत्यू झाला.तर चालक अक्षय यादव सिरसट (वय. 22)जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच रत्नापूर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले जखमी चालकाला 108 ला कॉल करुन उपचारासाठी पाठवले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा प्राथमिक रुग्णालयात पाठवला. चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुणीच्या अकाली मृत्यूने वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

 
Top