तुळजापूर (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आय महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या माध्यमातून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत महाविकास आघाडीची विकासाची वज्रमूठ अधिक घट्ट केली. या सभेला शिवसैनिकांसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि गंधोरा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या आक्रमक शैलीत मार्गदर्शन करत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली आणि स्थानिक विकासाचा आराखडा मांडला. मूलभूत प्रश्नांवर भर: सभेमध्ये शेतकरी, महिला आणि युवकांच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शेतीसाठीची वीज आणि पाणी या विषयांवर खासदार निंबाळकर यांनी पक्षाची ठाम भूमिका स्पष्ट केली. विकासाची दिशा: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा सर्वसामान्यांच्या विश्वासावर आधारलेला पक्ष आहे. विकास, न्याय आणि लोकहितासाठी आमचा लढा कायम राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनीही मतदारांशी संवाद साधला. निवडून आल्यानंतर प्रामाणिक सेवा, पारदर्शक कारभार आणि गांवाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, अशी ग्वाही उमेदवारांनी दिली. या सभेमुळे गंधोरा गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांचा मोठा कौल दिसून येत आहे. सभेच्या यशस्वीतेसाठी महाविकास आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले.यावेळी जितेंद्र कानडे संजय भोसले व आदीसह उमेदवार इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
%20%E0%A4%B5.jpeg)