धाराशिव (ंप्रतिनिधी)- हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन आणि पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, धाराशिव तालुक्यातील सांजा येथील अनेक युवकांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.

संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार श्री. कैलास पाटील आणि सहसंपर्कप्रमुख नंदूभैय्या राजेनिंबाळकर यांनी सर्व युवकांचे हाती शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. प्रवेश केलेले प्रमुख कार्यकर्ते व युवक सांजा येथील हमु तात्या, देविदास सूर्यवंशी, नाना सूर्यवंशी, नंदू चांदणे, बंडू जकाते, संजय मोहिते, रामेश्वर गव्हाणे, निखिल जकाते, नामदेव चांदणे, विनोद चांदणे, सुनील चांदणे, नंदू पेठे, सोमनाथ कांबळे, श्रावण दाभाडे, सुनील बनसोडे, विजय चव्हाण, मुकुंद सूर्यवंशी, संदीप बंडू कदम, दत्ता कोळी, काका कदम, गुंपू काकडे, तुषार सूर्यवंशी, अमोल जाधव, रणखांब पप्पू यांसह इतर सहकाऱ्यांचा यात समावेश आहे.

“येणाऱ्या काळात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून हे सर्व तरुण ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न हिरिरीने सोडवतील. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून शिवसेना संघटना अधिक बळकट करण्याचे काम हे युवक करतील.“ या पक्षप्रवेशामुळे सांजा परिसरात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून, तरुण वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


 
Top