धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत श्रीसिद्धीविनायक परिवाराच्या फिलगुडी शॉपचे उद्घाटन परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते बार्शीनाका चौकात करण्यात आले.
शहरातील ग्राहकांना शुद्ध, पारंपरिक आणि झटपट तयार होणारे गुळावर आधारित पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गुळ पावडर उद्योगातील यशस्वी वाटचालीनंतर श्री सिद्धीविनायक परिवाराने आता इन्स्टंट प्रीमिक्सच्या माध्यमातून ग्राहकांसाठी नवे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये गुळ पावडर प्रीमिक्स, गुळ इन्स्टंट लापशी, गुळ इन्स्टंट लाडू, गुळ चहा, गुळ कॉफी, गुळ इन्स्टंट खीर आदी उत्पादनांचा समावेश आहे. चहा व कॉफी वगळता इतर सर्व खाद्यपदार्थांमध्ये दर्जेदार ड्रायफ्रूट्स व तुपाचे मिश्रण करण्यात आले आहे. उत्तम आणि दर्जेदार चव चाखायला मिळणार आहे. या प्रीमिक्सच्या साहाय्याने ग्राहकांना झटपट ड्रायफ्रूट लाडू, खीर यांसह विविध चविष्ट पदार्थ सहज तयार करता येणार आहेत. पारंपरिक चवीला आधुनिक सोयीची जोड देत स्थानिक स्तरावर स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. दरम्यान उद्घाटनप्रसंगी श्री सिद्धीविनायक परिवारातील बालाजी कोरे, दिनेश कुलकर्णी,प्रतीक देवळे ,गणेश कामटे, राजकुमार जाधव, देवीदास कुलकर्णी, अरविंद गोरे, रामचंद्र सारडे, प्रथमेश आवटे, मंगेश कुलकर्णी, प्रद्युम्न मोरे, शुभम मिंडे, महादेव फुलारी यांच्यासह श्री सिद्धीविनायक परिवारातील सदस्य उपस्थित होते.

