धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे वास्तव ग्रुपच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी धाराशिव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला पाणीपुरवठा सभापती विलास बापू लोंढे, नगरसेवक राहुल काकडे, नगरसेविका वंदना बापू पवार, माजी नगरसेवक बापू पवार यांच्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील असंख्य शिवभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शिवभक्तांनी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून समाजात न्याय, समानता आणि स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली, या भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे वास्तव ग्रुपच्या वतीने हा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थितांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी वास्तव ग्रुपचे खंडू चांदणे,भारत कांबळे,सोमनाथ पेठे,अजय चव्हाण , पंकज चव्हाण,वीरा चव्हाण, रोहन कदम,गणेश काशीद,योगेश कसबे,बापू चव्हाण,शिवा तुपे आदी उपस्थित होते
