धाराशिव (प्रतिनिधी)- पुणे येथे गझल मंथन साहित्य संस्था आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलन, पुणे येथे आयोजित केले असून अध्यक्षपदी ज्येष्ठ गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी तर स्वागताध्यक्षा म्हणून गझलकारा वैशाली माळी यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात देणाऱ्या गझलध्यास पुरस्काराच्या पहिल्या मानकरी धाराशिवच्या स्नेहलता झरकर -अंदुरे या ठरल्या.
अतिशय दर्जेदार गझल लिहिणाऱ्या स्नेहलता झरकर -अंदुरे यांनी अनेक गझल संमेलनातून निमंत्रित गझलकारा म्हणून गझल सादर केली असून त्या यापूर्वी गझल संमेलना मुशायरा अध्यक्षा राहिलेल्या आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनातूनही त्यांनी आपल्या कवितेबरोबरच गझलही सादर केलेली आहे. या संमेलनात ज्येष्ठ गझलकारा ममता सिंधुताई सपकाळ यांना गझलक्रांती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. नव्या पिढीच्या नामांकित गझलकारा व पुणे विभाग सचिव वैशाली माळी यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गझलकारा ज्योत्स्ना रजपूत यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून गझलकारा श्रद्धा खानविलकर, गझलकारा निर्मिती कोलते, कौतिक दांडगे उपस्थित राहतील. गझलकारा दिपाली कुलकर्णी यांना गझलयात्री पुरस्कार व अनुजा कौतिक दांडगे यांना गझलसखी पुरस्कार देण्यात येणार आहेत. गझल संमेलनाचा गझल रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझलमंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, संयोजक डॉ. शिवाजी काळे, संमेलन समन्वयक प्रदीप तळेकर तसेच पुणे जिल्हा व विभागीय कार्यकारिणीने केले आहे.
