मुरुम (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ब मुरूम मोड ते मुरूम -आलूर -बोळेगाव मार्गे अक्कलकोटला जोडणारा रस्ता काम घिसाड घाईने उरकण्यात आले त्यामुळे रस्त्यावर ठिठिकाणी खड्डे पडले आहेत त्याचबरोबर आलूर -बोळेगाव रस्ता काम अद्याप प्रलंबित असल्याने वाहतुकीस, नागीरकांना त्रासाना सामोरे जावे लागत आहे, याबाबत समाजसेवक तथा बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी 14 सप्टेंबर रोजी सदरील प्रलंबित रस्त्यावरील पाणी साचलेल्या खड्ड्यात बसून लाक्षणिक आंदोलन करीत संबंधित विभागाला रस्ता काम तात्काळ पूर्ण करावी अशा मागणीचे पत्र दि. 18. 09. 2025 व दि. 06 ऑक्टोबर रोजी ईमेलच्या माध्यमातून केली होती अन्यथा दि. 14 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा ईशारा पत्रात दिला होता. संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दि. 13 ऑक्टोबर रोजी मुरूम पोलीस स्टेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, राष्ट्रीय महामार्ग विभाग अधिकारी, शेतकरी, बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्यात बैठक संपन्न झाली आणि सदरील 1300 मीटर रस्त्यावर तूर्तास दुरुस्ती करण्यास शेतकऱ्यांनी समत्ती दर्शवली त्यामुळे आणि संबंधित विभागाच्या लेखी आश्वासना नंतर 14 ऑक्टोबर रोजीचा आंदोलन स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित विभागाने तात्काळ मुरूम मोड ते बोळेगाव रस्त्यावरील ठिक ठिकाणचे खड्डे दुरुस्ती काम आणि प्रलंबित रस्त्यावर मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात आले. मात्र डांबारीकरण काम अद्याप प्रलंबित आहे, सदरील विषयावर डॉ. पुराणे यांचा कायम पाठपुरावा चालू होता पुन्हा 11 जानेवारी 2026 रोजी पत्र पाठवून प्रलंबित आलूर -बोळेगाव रस्ता (1300) रस्ता काम पूर्ण करण्यास विनंती केली होती, मात्र शेतकऱ्यांची अधिक जमीन अधिग्रहण म्हणजे भूसंपादन रक्कम मंजुरी मिळाले नसल्याने सदरील रस्ता काम अद्याप प्रलंबित आहे. दि. 18. 02. 2026 रोजी संबंधित विभागानी पत्र पाठवून सदरील रस्ता कामासाठी भूसंपादन ची मंजुरी भूतल परिवहन मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्राप्त झाली असून सदरच्या मंजुरी अन्वये भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून आलूर बोळेगाव रस्त्याचे (1300मी ) रस्ता काम हाती घेऊन पूर्ण करण्यात येणार असल्याबाबत पत्राद्वारे डॉ. रामलिंग पुराणे यांना कळवीण्यात आले आहे.
