धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुण व उपजत गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यात लपलेले कलेला प्रोत्साहन देण्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन प्रशालेच्यावतीने 26 जानेवारी अर्थात्‌‍ प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आले होते.

प्रथम  गुरुवर्य के .टी . पाटील सरांच्या प्रतिमेचे पूजन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी केले. या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

तर प्रमुख उपस्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, युवा नेते तथा हातलाई शुगर लिमिटेडचे चेअरमन अभिराम पाटील, प्लाईंग कीडस इंटरनॅशनल इंग्लीश स्कूलच्या सीईओ डॉ. मंजुळाताई आदित्य पाटील, शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी दैवशाला हाके, प्राचार्य डॉ.गोरख देशमाने, प्राचार्य डॉ.गजानंद वाले यांची होती.

या स्नेहसंमेलनात हिंदी -मराठी गीतावरील नृत्यासह, गायन, एकांकिका, लावणी नृत्य, गोंधळी गीते यांचे उत्तम सादरीकरण इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले . या सर्वांना मार्गदर्शन ए.व्ही. शेंडगे, श्रीमती पवार, श्रीमती  एम. एम.धावणे, श्रीमती मंजुषा पवार ,श्रीमती एम. साळवी,  सौ. अर्चना देशमुख मॅडम, श्रीमती संगीता  शिंदे, सौ.पी.डी.परतापुरे, श्रीमती पी.पी.मैत्रे ,श्रीमती ठाकूर, श्रीमती पी.एस. मोरे  यांनी मार्गदर्शन केले  मनोज शेगर , टी.पी. शेटे , शेषनाथ वाघ, वैभव चौधरी, हनमंत ठेले, धनपाल ओव्हाळ यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार नन्नवरे होते. तर उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, श्रीमती बी.बी. गुंड, बी.एम. गोरे , प्रा. विनोद आंबेवाडीकर, कैलास कोरके, मोहन शिंदे उपस्थित होते. तर पर्यवेक्षक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्कृष्ट रित्या संपन्न झाला.

 
Top