धाराशिव (प्रतिनिधी)- शहारातील पत्रकार धनंजय रणदिवे यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने युरोप कृषी अभ्यास दौऱ्यास निवड झाली असून देवगिरी प्रांत धाराशिव जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने दैनंदिनी पुष्प देऊन अभ्यास दौऱ्यास शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी देवगिरी प्रांत दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ, जिल्हा संरक्षक प्रभाकर चोराखळीकर, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल ढगे, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, पदाधिकारी घनश्याम बजाज, संतोष बडवे उपस्थित होते.
