तुळजापूर (प्रतिनिधी)- लातूर येथील भाविक नेहा शामराव अंधारे या आपल्या कुटुंबासमवेत मंगळवार, दिनांक 3 फेब्रुवारी रोजी रात्री श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आल्या होत्या. देवीवरील अपार श्रद्धा आणि भक्तिभावातून त्यांनी श्री तुळजाभवानी देवीस 76.610 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने नेहा अंधारे यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देत यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सहायक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
