भूम (प्रतिनिधी)- येथील शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथील इतिहास विभागातील प्रा. नंदू रामभाऊ जगदाळे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथून इतिहास विषयात आचार्य (पीएचडी) पदवी संपादन केली आहे. त्यांचा विषय “बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचे ऐतिहासिक मूल्यमापन” हा आहे .हे संशोधन डॉ. नानाचंद ताराचंद वानखडे श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
प्रा. नंदू जगदाळे हे सध्या शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम (जि. धाराशिव) येथे इतिहास विभागात कार्यरत आहेत. त्यांनी आपले उच्च शिक्षण बी.ए. पर्यंत श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथून पूर्ण केले आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्या विकास मंडळ, पाथरूडचे अध्यक्ष डॉ. उद्धव बोराडे, उपाध्यक्ष प्रा. डी. डी. बोराडे, सचिव मुरलीधर काटे, उपसचिव तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे, कोषाध्यक्ष अतुल सुरवसे, संस्था सदस्य उत्तम बोराडे, तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे यांनी प्रा. नंदू जगदाळे यांचे अभिनंदन केले आहे.
