वाशी:(प्रतिनिधी)- कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची १२३ वी जयंती येथील कर्मवीर महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे वाशी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक शंकरराव शिंदे,श्रीकांत थोबडे (माजी जनरल मॅनेजर महिंद्रा अँड महिंद्रा मुंबई),महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मच्छिंद्र तात्या कवडे, भाई भगवानराव उंदरे(माजी सरपंच वाशी),प्राचार्य डॉ.अशोक कदम,पत्रकार प्रा.शहाजी चेडे,प्रा.श्रीराम ढेपे व प्रा.विश्वास चौधरी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते मामांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना भाई भगवानराव उंदरे म्हणाले कि, वाशी सारख्या ग्रामीण भागामध्ये कर्मवीर डॉ.जगदाळे मामांनी हायस्कूल आणि महाविद्यालय काढल्यामुळे गोर गरीब कष्टकऱ्यांची व शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करत आहेत. मच्छिंद्र तात्या कवडे म्हणाले कि, हे महाविद्यालय सुरु करत असताना खूप अडचणी आल्या पण गावकऱ्यांच्या मदतीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे महाविद्यालय सुरु केले गेले व आज ते नावारूपाला आले आहे असे त्यांनी सांगितले. ओश्रीकांत थोबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि,मामांच्या संस्थेतील विद्यार्थांना शिक्षण आणि उच्च संस्कार मिळाले त्या आधारे त्यांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले असे ते म्हणाले.
पोलिस निरीक्षक शंकरराव शिंदे म्हणाले की,या संस्थेने विविध शाखा चालवत असताना पैशाचा विचार न करता विद्यार्थांना शिक्षण दिले तसेच ग्रामीण भागातील गोर-गरीब लोकांच्या आरोग्याविषयी अडचणी सोडवल्या असे ते म्हणाले. प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम यांनी कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक कार्याविषयी आणि महाविद्यालयातील विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ दैवशाला रसाळ यांनी केले तर आभार प्रा.अजित तिकटे यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.
