तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथे स्व.अजित पवार यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेताना अनेकांचे डोळे पाणावले.

तेर येथे माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या निवासस्थानी स्व.अजित पवार यांच्या अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी उपस्थितांचे  अस्थी कलशाचे दर्शन घेताना डोळे पाणावले. अस्थीचे  तेरणा नदीच्या पाण्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


 
Top