धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक- 2026 निमित्त तेर येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. यावेळी युवक नेते मल्हार पाटील, तेर गटातील उमेदवार व जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील उपस्थित होत्या.
यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या गावाच्या विकासाचा भक्कम पाया. गावातील रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा मजबूत करण्याची ताकद याच निवडणुकांमधून मिळते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. आपणही आवर्जून मतदान करा आणि आपल्या गावाच्या प्रगतीसाठी योगदान द्या असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
