धाराशिव (प्रतिनिधी)- बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा च्या होऊ घातलेल्या 2026 च्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी लोहारा तालुका विधीज्ञ मंडळाला आज रोजी भेट दिली असता त्या ठिकाणच्या सर्व विधीज्ञानी लोहारा तालुका विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. वचने तसेच तेथील सर्व विधीज्ञानी एकमताने त्यांच्या बारचा ठराव घेऊन ॲड. अविनाशराव नरसिंगराव देशमुख काटीकर यांना पाठिंब्याचा ठराव देऊन पुढील वाटचालीसाठी धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात सहभागी होण्याचे आश्वासन दिले.
त्याप्रसंगी मनोगत पर प्रास्ताविक व्यक्त करताना लोहारा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. रामदास जाधव त्यानंतर ॲड. राज कुलकर्णी, ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी यापूर्वी ॲड. राम गरड, ॲड. मिलिंद पाटील यांना धाराशिव जिल्ह्यातील विधिज्ञांच्या एकीमुळे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. त्याच धर्तीवर पुन्हा सर्वांनी एकजुटीने सहकार्य केले. तर आपल्या धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अविनाशराव दादाना प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिले. तर त्यांच्या रूपाने हॅट्रिक पूर्ण नक्की होईल असा विश्वास व्यक्त केला. आणि सर्वांनी येत्या 24 मार्चला प्रथम पसंतीचे मतदान ॲड. अविनाशराव दादा यांना करण्याचे आव्हान केले.
त्यानंतर ॲड. अविनाशराव दादा यांनी या निवडणुकीमध्ये सर्व लहान थोर विधीज्ञ बंधू भगिनींना बरोबर घेऊन प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर सर्व विधीज्ञाची मान उंचावेल अशा पद्धतीने काम करण्याचे आश्वासन त्या ठिकाणी दिले. याप्रसंगी धाराशिव विधीज्ञ मंडळाचेही सीनियर ज्युनिअर विधीज्ञ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोहारा बारचा ठराव दिल्याबद्दल ॲड. अमोल वरुडकर अध्यक्ष जिल्हा विधीज्ञ मंडळ धाराशिव यांनी लोहारा तालुका विधीज्ञ मंडळाचे आभार मानले.
