भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये संत गाडगेबाबा यांची150 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पारधी पेढी गोलेगाव येथील शिक्षक संतोष तोडकरी होते ;तर अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते. मान्यवरांच्या हस्ते गाडगे बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वर्गशिक्षक जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावी वर्गातील अविष्कार माने या विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी अतिशय समर्पक अशी कविता सादर केली. मनोगत तोडकरी म्हणाले की, “जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपण स्वच्छतेला महत्त्व दिलेच पाहिजे. स्वच्छता हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो .स्वच्छतेमुळे मन प्रसन्न होते. गाडगे महाराजांनी स्वच्छतेत  देव पाहिला होता. असे सांगितले. तात्या  कांबळे अध्यक्षीय समारोपात म्हणाले की, “आपण या वयामध्ये घरातील स्वच्छता करून आईला मदत केली पाहिजे. आपण स्वयंपाक करण्यास शिकले पाहिजे .  त्यामुळे आपण परदेशामध्ये शिक्षणास गेल्यावर  स्वदेशी जेवण स्वतः करून खाऊ शकतो. शिक्षणाबरोबर स्वच्छता ही तितकीच महत्त्वाचे आहे “ असे सांगितले .कार्यक्रमाला काकासाहेब पवार, दयानंद पाटील ,अविनाश जोशी, राजेंद्र गाडे ,प्रतिभा मुकटे ,हरीश साठे ,सागर अकोस्कर उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश जोशी यांनी मानले.


 
Top