धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवमध्ये सोमवारी (दि. 23) पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या पावसाने विशेषतः गहू आणि हरभरा पिकांवर या पावसाचा परिणाम झाला आहे. पिके वाढीच्या टप्प्यात असल्याने पुढील काही दिवसांत रोगराईचा धोका वाढू शकतो. तर काढणीला आलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. द्राक्ष, आंबा आणि पपई या फळ पिकांनाही पावसाचा फटका बसल्याची माहिती आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणातील उकाडा काहीसा कमी झाला आहे. आगामी काही दिवसांत आणखी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.