कळंब (प्रतिनिधी)- प्रत्येक गावाची एक ओळख असते,ती ओळख सर्व दूर पसरलेली असते.त्या मुळे त्या गावाचा नाव लौकिक ही वाढतो.कळंब हे खवय्या चे गाव म्हणून परिचित आहे.इतर बाजार पेठे प्रमाणेच इथे स्वादिष्ट पदार्थांना मोठी मागणी असते.कळंब च्या बाहेर असणारे लोक, गावाकडे आल्या नंतर येथील पदार्थ तर खातातच ,पण जाताना घेऊन पण जातात.कळंब मध्ये बाजार दिवशी , भुई चिवडा ची मोठी उलाढाल होते.खमंग चिवडा व इतर पदार्थ खाण्या साठी खवय्ये आवर्जून येतात.जिल्ह्यात कुठे ही बाजार असला की ही मंडळी तिथे जाऊन गरम चिवडा, व इतर पदार्थ आवडीने खातात.
पिढ्या न पिढ्या चालत असलेल्या अनेक व्यवसायाने कळंब ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.मराठवाड्यात, भुईचिवडा चा कळंब येथील बाजार सर्वात मोठा असतो.येथील भुई समाज व इतर समाजाचे लोक होलसेल व किरकोळ चिवडा, जिलबी, भजे, बालू शाई, नुकती आदी गरमागरम ,रुचकर पदार्थ बनवतात. दर सोमवारी कळंब येथे मोठी उलाढाल होते. बाजारा साठी आलेल्या प्रत्येक जणांना, हा चिवडा घरी नेल्या शिवाय राहवत नाही.तर काही जण फक्त चिवडा व गरम जिलबी, भजे खाण्या साठी बाजारात येत असतो.असा हा कळंब मधील शेव चिवडा. तर कळंब मध्ये नाना ची पुरी भाजी ,बाबू चे पेढे, ऋषभ मधील फरसाण ,अनिल मधील दही धपाटे , खव्याची पोळी, इलाइ ची भेळ,शिवगण चा वडापाव , असो.....की समर्थ गाड्यावरची इडली सांबर,उडीद वडे असो, की कडाक,गरमागरम बालाजी खारमुरे, फुटाणे आदी ठिकाणी खवय्ये लोक गर्दी करतात.कमी पैशात खमंग खाण्या साठी थांबावे लागते.
एकदा याल तर परत परत खाल........ या प्रमाणे या लहान व्यापाऱ्यांनी खमंग पना जपला आहे. त्यामुळे सर्वगुण संपन्न आमचे कळंब मध्ये कपडा,सोने, किराणा , शूज मार्केट या प्रमाणे आता खमंग पदार्थाचा सुगंध ही सर्व दूर पसरला आहे.येथील भुई चिवडा,प्रसिद्ध असून,मोठ्या ऑर्डर ही स्वीकारल्या जातात. ग्राहक समोरच मिरची,बटाटा ,पालक भज्जी काढण्यात येते.येथे खव्व्ये मस्त बसून याचा स्वाद घेतात. कळंब येथे शहर व ग्रामीण भागातील खव्व्ये मोठ्या प्रमाणावर येत असतात, त्या मुळे नगर परिषदेने खाऊ गल्लीसाठी जागा द्यावी अशी मागणी होत आहे.
