धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ईटकूर जिल्हा परिषद गटातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अनंत नानासाहेब लंगडे तसेच पंचायत समिती गणातील महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई धनंजय वरपे यांच्या प्रचारार्थ अंदोरा, ता. कळंब येथे जाहीर सभा मल्हार पाटील यांची संपन्न झाली. सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महायुतीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख धोरणांचा लाभ गावागावात पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काचे, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी असलेले आणि विकासासाठी कटिबद्ध उमेदवार निवडून देणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर अधिकाधिक विकास निधी उपलब्ध होऊन अंदोरा व परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळू शकते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेने विकास, स्थैर्य व विश्वासाला मत देत महायुतीचे अनंत नानासाहेब लंगडे व सौ. राजश्रीताई धनंजय वरपे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. 

या सभेस शिवाजी कापसे, अजित पिंगळे, शिवाजी गिड्डे, रामराजे जाधव, अशोक तांबारे, पी. जी. नाना तांबारे, लक्ष्मण हुलजुते, अनंत वाघमारे, सुरेश कवडे यांच्यासह अंदोरा व परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top