धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहर वाहतूक शाखेच्यावतीने धाराशिव शहरात रिक्षा व मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या रॅलीस अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखविण्यात आला.
पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहरातून रिक्षा व मोटारसायकल रॅली धाराशिव शहरातील वाहतूक शाखा कार्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, मध्यवर्ती शासकीय इमारत मार्गे वाहतूक शाखेत विसर्जित करण्यात आली. तर यावेळी रक्तदान शिबीर घेण्यात आले. तसेच हेल्मेट वाटप रिक्षा रॅली तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले. याबरोबरच शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालये मार्गदर्शन करण्यात आले.
