धाराशिव (प्रतिनिधी)-  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट गेल्या 12 वर्षांत पूर्ण झालेले नाही. उलट शेतीवरील उत्पादन खर्च दुप्पट ते तिप्पट झाला आहे. आताही या अर्थसंकल्पात उत्पादन वाढीच पोकळ आश्वासन दिले आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.

कोणत्याही शेतमालाला योग्य दर मिळत नाही यावर शासन कोणतीही ठोस योजना राबवित नसल्याचे दिसत आहे. पीकविमा धोरण देखील कंपनी धार्जिन केल्याने त्यामध्ये बदल करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. डब्बल इंजिनच्या नावाने गळा काढणारे अश्या निर्णयामध्ये समन्ववयाने जनहित का साधत नाहीत. देशाच्या उत्पन्नातील 58 टक्के पैसा हा फक्त दहा टक्के लोकांकडे असून राहिलेल्या लोकांकडं केवळ 15 टक्के उत्पन्न आहे. यामुळे देशात विषमतेची दर गेल्या काही वर्षात कशी वाढत आहे हे आकडेवारीवरून दिसत आहे. देशाच्या एकूण संपत्तीपैकी सुमारे 40 टक्के संपत्ती 1 टक्का लोकांकडे असल्याच चित्र हेच मोदी सरकारच खरं रूप आहे. अशी टिका आमदार पाटील यांनी केली आहे. 

 
Top