धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ माजी नगरसेवक श्रीकांत अनंतराव कुलकर्णी अंबेजवळगेकर यांचे वयाच्या 93 व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
धाराशिव नगरपालिकेला ते 1967 आणि 1974 असे दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून विजयी झाले होते.उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते. ते आंबेजवळगा येथील मोसंबी फळबाग शेतकरी म्हणून प्रसिद्ध होते.आंबेजवळग्याच्या विकासासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन,जावई, नातू, पणतू, पणती असा परिवार आहे. जिल्हा सहाय्यक सरकारी वकील ॲड. आशिष कुलकर्णी यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिव देहावर रात्री नऊ वाजता आंबेजवळगा त्यांच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
