भुम (प्रतिनिधी)- उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख पंचायत समितीचे माजी उपसभापती मेघराज पाटील यांनी पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. शनिवारी (ता.31) येथील प्रितम मंगल कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात त्यांनी प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके , नवनाथ जगताप, राहूल डोके रिपब्लिकन पार्टी (आठवले गटा) चे संजयकुमार बनसोडे , विशाल देवकर दत्ता रणभोर, रत्नकांत शिंदे आदी उपस्थित होते. गणेश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विशाल देवकर यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रमासाठी मेघराज पाटील समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.
