धाराशिव (प्रतिनिधी)- तेर येथील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते व पंचायत समितीचे माजी सदस्य  बाबूराव नाईकवाडी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण प्रवेशामुळे तेर परिसरात भाजप व महायुतीची ताकद अधिक भक्कम झाली असून, विकासाभिमुख राजकारणाला बळ मिळाले आहे. यावेळी बाबूराव यांचे भाजपात मनःपूर्वक स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

या प्रवेशप्रसंगी इतिष चौगुले, उबाठा शिवसेना विभागप्रमुख अमोल थोडसरे, तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बापूराव नाईकवाडी व सोसायटीचे व्हा. चेअरमन रतन नाईकवाडी यांनीही भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. विविध पक्षांतील अनुभवी व कार्यक्षम कार्यकर्त्यांचा होत असलेला प्रवेश हा भाजपच्या संघटनात्मक मजबुतीचा व लोकविश्वासाचा स्पष्ट दाखला आहे. तेर परिसराचा सर्वांगीण विकास महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. केंद्र व राज्यातील भाजप नेतृत्वाच्या सक्षम व विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जि.प. गटातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील तसेच पंचायत समितीच्या उमेदवार सौ. जया नवनाथ नाईकवाडी यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी एकदिलाने, जोमाने व पूर्ण ताकदीनिशी काम करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी सोडला. पक्षप्रवेशाच्या संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे व विजयाचा आत्मविश्वास निर्माण करणारे वातावरण होते.

यावेळी महायुतीच्या जि.प. गटातील उमेदवार अर्चना पाटील यांच्यासह शिवाजीराव नाईकवाडी, पद्माकर फंड, नवनाथ नाईकवाडी, प्रशांत वाघ, राजाभाऊ सोनटक्के, सुधाकर अबदारे, बालाजी मुळे, तेर येथील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top