धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगरच्या वतीने द्वितीय गळीत हंगाम 2025 - 26 मधील सातव्या पंधरवाड्यात 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल 2700/- प्रमाणे दि.02 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे.
एनव्हीपी शुगरच्या वतीने चाचणी गळीत हंगामापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची परंपरा सुरू केली आहे. द्वितीय गळीत हंगामात देखील ही परंपरा कायम आहे. कारखान्यास ऊस गाळपासाठी दिलेल्या ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आपले बिल घ्यावे. ज्यांनी खाते दिले नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस गाळपासाठी देऊन सहकार्य करावे असे आवाहनही चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.
